अजिंक्यतारा
किल्ला
अजिंक्यतारा किल्ला ३०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. अजिंक्यतारा हा किल्ला सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरामंध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो .
इतिहास साताराचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज दुसरा याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला.किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा, ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्यांचे नामांतर केले अजिंक्यतारा पन ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावा प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोनदरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्हीबुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत.
अलंग
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.
गडावरील ठिकाणे
किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई,औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
अंजनेरी
वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे.
इतिहास
अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.

गडावरील,पहाण्यासारखी,ठिकाणे
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहे. समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही.

गडावर,जाण्याच्या,वाटा
किल्ल्यावर जाण्यासाठीची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावरील फाट्यावर उतरावे. या फाट्यापासून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे. गावातून नवरा-नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो.

अंकाई किल्ला
अजिंठा.सातमाळा या डोंगररांगेवर हे दोनदुर्गवीर मोठ्या दिमाखात उभे आहेत. इ.स. १६३५ मध्येशहाजहानचा सेनापती खान याने हे किल्ले ताब्यातघेतल्याचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या शेवटच्या युद्धातएप्रिल १८१८ मध्ये किल्लेदाराने हे किल्ले इंग्रजांच्यास्वाधीन केले. दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे वउत्तरेकडील गिरणेचे खोरे, खानदेश या मुलखांवरनजर ठेवण्यासाठी हे दुर्गवीर महत्त्वाचे होते.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मनमाडच्या दक्षिणेस सुमारे १५ किमी अंतरावर दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई गावाजवळ ‘अंकाई-टंकाई’ ही किल्ल्यांची जोडगोळी ठाण मांडून बसली आहे. पुणे-संगमनेर-कोपरगाव-येवला असा सुमारे २२५ किलोमीटरचा प्रवास करून येवला शहर गाठायचे. इथून पुढे येवला-मनमाड-मालेगाव या रस्त्याने मनमाडच्या दहा-बारा किलोमीटर अलिकडे अंकाई रेल्वे स्टेशन व पुढे उजव्या हातास अंकाई गावाकडे जाणारा रस्ता लागतो. रेल्वे स्टेशनपासूनच हे किल्ले दिसू लागतात. यांना वळसा घालून ‘अंकाई’ गावात पोहचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव होय.
समुद्रसपाटीपासून साधारण ९६० मीटर उंचीवर अंकाई तर ८५० मीटर उंचीवर टंकाई किल्ला आहे.
अर्नाळा किल्ला
इतिहास :
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली.
सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते.
तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकुण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे.
या प्रवेशद्वाराच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखामधील बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर
! पाश्चात्यासि वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा
! या ओळीवरून या किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्याने केली हे लक्षात येते किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे.
गडावर जाण्याचा वाटा :पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी.
वर असून येथे जायला एस.टी बस व रिक्षा यांची सुविधा आहे.
अर्नाळा गावातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी ६:०० ते दुपारी १२:३० व संध्याकाळी ४:०० ते ७:०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनाऱ्यावरून समोरच दिसणाऱ्या अर्नाळा किल्लावर बोटी जायला ५-१० मिनिटे लागतात.
अवचितगड
किल्ला
अवचितगड किल्ला ३०० मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
कर्जत जिल्ह्यातील रोहा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगडा पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या पिंगलसई गावापासून गडाची उंची ३०० मी. भरते. घनदाटा झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूणंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे कुंडातील पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. जवलच खंडोबाची काल्या पाषाणातील मूर्ती आहे. पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगडा, धनगड, कोरीगड, रायगड, सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर न्याहाळता येतो.
गडावर जाण्यच्या वाटा पिंगळसई मार्ग : अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून पायी दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपन पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते
.
भैरवगड.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो...भैरवगड हा कोयनानगरच्या विभागात मोडणार किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग रांगेपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर बसवण्यात आली आहेत. त्यामुळे माणसां वावर तसा कमीच. पायथ्याशी गावं गाठण्यासाठी एस.टी. चांगली सोय आहे.

गडावर जाण्यच्या वाटा : १. पिंगळसई मार्ग : अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून पायी दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपन पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते
गडावर जाण्याच्या वाटा :-१. दुर्गवाडी मार्गे : या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळून गाठावे. चिपळूण करून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास
भुदरगड
इतिहास : हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला. जिंजीवरुन परत येताना, छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते. अठरावे शतक सरताना, परशुरामभाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १० वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात हया गडावरील शिंबदीने भाग घेतला होता. बाबाजी आयेरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता, त्याला सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह उत्तम साथ दिली होती. इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता.
पोहोचण्याच्या वाटा : १ कोल्हापूरहून ‘गारगोटी’ला जाणार्या अनेक एसटी बसेस आहेत. गारगोटी वरून पाल नावाच्या गावात जायचे, अंतर साधारण ५ कि.मी आहे. तिथपर्यंत जाण्यास खाजगी वहाने मिळतात. पालपासून पेठशिवापूर साधारण अर्ध्या तासाचे अंतर आहे स्वत:चे वहान असल्यास आपण वाहन थेट भुदरगडावर घेऊन जाऊ शकतो.
२ स्वत:चे वाहन असल्यास गारगोटी - पुष्पनगर - शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठशिवापूर - भुदरगड गाठता येते. |
|

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा